ETV Bharat / sports

Ind vs NZ : अखेर न्यूझीलंड विजयी, ३४७ धावा करुनही भारताचा दारुण पराभव - भारताचा न्यूझीलंड दौरा

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी अर्धशतकी सलामी दिली. संघाची धावसंख्या ८५ असताना गुप्टील (३२) बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने केदार जाधवकरवी झेलबाद केले. टॉम ब्लंडल आणि हेन्रीने न्यूझीलंडला शंभरी गाठून दिली.

India vs New Zealand live score 1st ODI at Hamilton: de Grandhomme run out, New Zealand 6 down
Ind vs NZ : अखेर न्यूझीलंड विजयी, एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव
author img

By

Published : Feb 5, 2020, 7:52 AM IST

Updated : Feb 5, 2020, 3:47 PM IST

हॅमिल्टन - भारताविरुद्ध सुरू असलेल्या दौऱ्यात यजमान न्यूझीलंडने पहिला विजय नोंदवला. रॉस टेलरचे नाबाद शतक आणि कर्णधार टॉम लाथम-हेन्री निकोलस या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना ४ गडी राखून जिंकला. भारताने दिलेले ३४८ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी अर्धशतकी सलामी दिली. संघाची धावसंख्या ८५ असताना गुप्टील (३२) बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने केदार जाधवकरवी झेलबाद केले. टॉम ब्लंडल आणि हेन्रीने न्यूझीलंडला शंभरी गाठून दिली.

कुलदीप यादवने ब्लंडलला माघारी धाडत भारताला दुसरे यश मिळवून दिले. हेन्री-टेलर या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरला. यादरम्यान, हेन्रीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो व्यक्तिगत ७८ धावांवर असताना त्याला विराटने धावबाद केले.

हेन्री बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि कर्णधार टॉम लाथम यांनी शतकी भागिदारी करत संघाला तिनशे पार केले. कुलदीपला मोठा फटका मारण्याच्या नादात लाथम झेलबाद झाला. त्याने ४८ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. लॉथम बाद झाल्यानंतर टेलरने आपले शतक पूर्ण केले.

शमीने जिमी नीशमला बाद करत न्यूझीलंडला ५ वा धक्का दिला. नीशम बाद पाठोपाठ ग्रँडहोम आल्या पावली माघारी परतला. त्याला विराटने धावबाद केले. त्यानंतर टेलरने कोणतेही नुकसान न होऊ देता मिचेल सँटनरसह संघाला विजय मिळवून दिला. रॉस टेलरने ८४ चेंडूत नाबाद १०९ धावांची खेळी केली. या खेळीत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

श्रेयस अय्यरचे शतक आणि विराट कोहली-केएल राहुल या दोघांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३४७ धावांपर्यंत मजल मारली होती.

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत, मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांनी भारताला सलामी दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शॉला (२०) ग्रँडहोमने लॉथम करवी झेलबाद केले. शॉ पाठोपाठ मयांकही (३२) साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो मोठी खेळी साकारणार असे वाटत असताना, ५१ धावांवर इश सोधीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर आणि राहुल जोडीने पुन्हा एकदा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १३६ धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यरने यादरम्यान आपले शतक पूर्ण केले. त्याला साऊदीने सँटनरकरवी झेलबाद केले. त्याने १०७ चेंडूत ११ चौकार आणि एक षटकारासह १०३ धावांची खेळी साकारली. राहुलनेही यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला त्रिशतकी धावसंख्या ओलांडून दिली. राहुलने नाबाद ८८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन गडी बाद केले. कॉलिन डी-ग्रँडहोम आणि इश सोधीने १-१ बळी घेतला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Feb 5, 2020, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.