ETV Bharat / sports

IND VS NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या 'आऊट'

हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. कसोटी मालिकेच्या संघ निवडीआधी पांड्याची फिटनेस टेस्ट घेण्यात आली, यात पांड्या नापास ठरला.

India vs New Zealand: Hardik Pandya ruled out of New Zealand Test series
IND VS NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या 'आऊट'
author img

By

Published : Feb 1, 2020, 3:50 PM IST

Updated : Feb 1, 2020, 4:28 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. कसोटी मालिकेच्या संघ निवडीआधी पांड्याची फिटनेस टेस्ट घेण्यात आली, यात पांड्या नापास ठरला. बीसीसीआयने यांची माहिती दिली. दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत सांगितले की 'न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. तो त्याच्या पाठीच्या दुखापतीवर पुढील उपचार घेण्यासाठी लंडनला जाणार आहे.'

  • Hardik Pandya(file pic) has been ruled out of the upcoming Test series against New Zealand. He traveled to London and was accompanied by National Cricket Academy Head Physio Ashish Kaushik for a review by spinal surgeon Dr. James Allibone. pic.twitter.com/rnjlPMdFqK

    — ANI (@ANI) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हार्दिक पांड्याला आशिया चषकादरम्यान पाठीला दुखापत झाली होती. तो त्यानंतरही काही मालिकांमध्ये खेळला. मात्र, २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत पांड्याची दुखापत पुन्हा उफाळून आली आणि तो संघाबाहेर गेला.

हार्दिकच्या पाठीवर काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये शस्त्रक्रीया करण्यात आलेली होती. यानंतर त्याच्यावर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयचे डॉक्टर आणि फिजीओ यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. पांड्याच्या पाठीच्या मणक्याला मोठा मार लागलेला आहे. त्यामुळे पांड्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी पांड्याला आता पुन्हा लंडनला नेण्यात येणार आहे.

हेही वाचा - ४ फेब्रुवारीला रंगणार भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना!

हेही वाचा - काय सांगता...नेपाळमध्ये गेल ठोकणार १०००वा षटकार!

Intro:Body:

marathi sports news

Conclusion:
Last Updated : Feb 1, 2020, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.