ETV Bharat / sports

Ind vs Eng : टीम इंडियाचा थरारक विजय, यॉर्कर स्पेशालिस्टची चमकदार कामगिरी - India vs England, 3rd ODI Highlights

भारताने इंग्लंडविरुद्धचा अखेरचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना ७ धावांनी जिंकत मालिका २-१ ने खिशात घातली.

India vs England, 3rd ODI : India beat England by 7 runs
Ind vs Eng ३rd ODI : रोमांचक सामन्यासह भारताने मालिका जिंकली
author img

By

Published : Mar 28, 2021, 10:20 PM IST

Updated : Mar 29, 2021, 1:04 PM IST

पुणे - टीम इंडियाने रंगतदार झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने २-१ च्या फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ५० षटकात ९ बाद ३२२ धावांपर्यंत मजल मारू शकला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात १४ धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या ६ धावा दिल्या. सॅम कुरेनने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद ९५ धावा करत कडवी झुंज दिली. पण तो देखील संघाचा पराभव टाळू शकला नाही. शार्दुल-भुवी जोडीने इंग्लंडचे ७ गडी बाद केले.

भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब नाही. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला १४ धावांवर तंबूत धाडत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर संघाची धावसंख्या २८ असताना मागील सामन्यात शतकी खेळी साकारलेल्या जॉनी बेअरस्टोला भुवीने वैयक्तिक एका धावेवर पायचित केले. बेन स्टोक्स (३५) आणि बटलर (१५) ठराविक अंतराने बाद झाले. तेव्हा लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेव्हिड मलान यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला दीडशेपार नेले. वैयक्तिक ३६ धावांवर असताना शार्दुलने लिव्हिंगस्टोनला बाद करत इंग्लंडला अडचणीत आणले. दहा धावांच्या अंतरानंतर डेव्हिड मलान अर्धशतक करून बाद झाला.

मलान बाद झाल्यानंतर मोईन अली आणि सॅम कुरेन या दोघांनी कडवी झुंज दिली. दोघांनी संघाची धावसंख्या २०० ला नेली. तेव्हा भुवनेश्वरने मोईन अलीला हार्दिककडे झेल देण्यास भाग पाडले. मोईनने २५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या आदिल रशिदने देखील कडवा प्रतिकार केला. या दोघांनी आठव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. तेव्हा शार्दुलने आदिल रशिदला बाद केले. विराटने रशिदला ऑफ साईडला अफलातून झेल टिपला. त्याने १९ धावा केल्या. सॅम कुरेनने एक बाजू लावून कडवी झुंज दिली. त्याने ८३ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ९५ धावांची खेळी केली. पण तो देखील संघाचा पराभव टाळू शकला नाही. भारताकडून शार्दुलने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर भुवीने ३ विकेट घेतल्या. टी नटराजनला एक गडी बाद करता आला.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी १०३ धावांची सलामी दिली. इंग्लंडच्या आदिल रशीदने रोहित शर्माला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ३७ धावा केल्या. रोहितनंतर आदिल रशीदने शिखर धवनला देखील बाद केले. शिखरने ५६ चेंडूत १० चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला (७) मोईन अलीने क्लीन बोल्ड केले.

भारताने तीन गडी १८ धावांत गमावले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ३६ षटकात भारताला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान, दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. सॅम कुरेन याने पंतला बाद करत ही जोडी फोडली. पंतने ६२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. त्याचा झेल यष्टीरक्षक बटलरने टिपला. यानंतर बेन स्टोक्सने हार्दिकला क्लीन बोल्ड करत भारताला जबर धक्का दिला. हार्दिकने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारासह ६४ धावांची खेळी केली.

हार्दिक बाद झाल्यानंतर कृणाल-शार्दुल जोडीने ४२ चेंडूत ४५ धावांची भागिदारी करत भारताला तिनशेचा टप्पा गाठून दिला. ४६व्या षटकात शार्दुल मार्क वूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २१ चेंडूत १ चौकार ३ षटकारासह ३० धावा केल्या. यानंतर कृणाल पांड्यादेखील (२५) बाद झाला. अखेरीस भारताचा संघ ३२९ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर आदिल रशिदने २ गडी बाद केले. सॅम कुरेन, मोईन अली, बेन स्टोक्स आणि लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Last Updated : Mar 29, 2021, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.