मुंबई - आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा काही तासांपूर्वी करण्यात आली आहे. आता सामन्यांचे ठिकाण आणि तारखा यांची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ या दौऱ्यात एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला एकदिवसीय सामना - २७ नोव्हेबर (सिडनी)
- दुसरा एकदिवसीय सामना - २९ नोव्हेबर (सिडनी)
- तिसरा एकदिवसीय सामना - २ डिसेंबर (कॅनबरा)
भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला टी-२० सामना - ४ डिसेंबर (कॅनबरा)
- दुसरा टी-२० सामना - ६ डिसेंबर (सिडनी)
- तिसरा टी-२० सामना - ८ डिसेंबर (सिडनी)
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला कसोटी सामना - १७ ते २१ डिसेंबर (अॅडलेड)
- दुसरा कसोटी सामना (बॉक्सिंग डे ) - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)
- तिसरा कसोटी सामना - ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२१ (सिडनी)
- चौथा कसोटी सामना - १५ जानेवारी ते १९ जानेवारी (गाबा)
(पहिला कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाणार आहे)
बॉक्सिंग डे सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे होणाऱ्या आगामी बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर व्हिक्टोरिया स्टेटचे प्रमुख डॅनियल अँड्र्यूज यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.