दिल्ली - ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरुद्ध चालू असलेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना जिंकून जबरदस्त पुनरागमन केले. यासह कांगारूंनी मालिकेत २-२ अशी बरोबरीही साधली आहे. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना उद्या राजधानी दिल्लीत रंगणार आहे.
भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र, भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होत असल्याचे चौथ्या आणि पाचव्या सामन्यात पाहायला मिळाले. त्यामुळे उद्या होणाऱया निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघाला गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची फलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे. उस्मान ख्वाजा, अॅरॉन फिंच . पीटर हँडस्काँब आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. तर पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांच्यावर भारतीय फलंदाजांना रोखण्याते आव्हान असणार आहे.
उद्याचा सामना जिंकणारा संघ ही एकदिवसीय मालिका आपल्या नावावर करणार असल्याने दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणार आहेत.
कुठे होणार सामना : दिल्ली येथील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे
वेळ : भारतीय वेळेनुसार उद्या (बुधवारी ) दुपारी १.२३० वाजता हा सामना सुरू होणार आहे.
कुठे पाहू शकता : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्ही हा सामना पाहू शकता.