नवी दिल्ली - भारताविरुद्ध ३ सामन्याची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आज (ता.९) दिल्लीत पोहोचला आहे. उभय संघात १२ मार्चपासून मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. आफ्रिकेचा संघ आज दिल्लीहून धर्मशाळाकडे रवाना होणार आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता खबरदारीच्या उद्देशाने, दक्षिण आफ्रिकेच्या १६ सदस्यीय संघासोबत त्यांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोएब मांजरा हेही भारत दौऱ्यावर आले आहेत.
दरम्यान, भारतीय संघ उद्या (मंगळवार) धर्मशाळामध्ये दाखल होईल. त्याआधी भारतीय खेळाडूंची बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी होणार आहे.
असा आहे भारतीय संघ -
- शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ -
- क्विंटन डी कॉक (कर्णधार ), टेम्बा बावूमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डु प्लेसिस, काइल वेरीने, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, एंडिल फेहलुक्वायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपामला, ब्युरेन हेंड्रिक्स, एनरिक नोर्टजे, जॉर्ज लिंडे आणि केशव महाराज.
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामान १२ मार्च - धर्मशाळा
- दुसरा एकदिवसीय सामना - १५ मार्च - लखनऊ
- तिसरा एकदिवसीय सामना - १८ मार्च - कोलकाता
हेही वाचा - माहीची अग्निपरीक्षा..! भारतीय संघात पुनरागमनासाठी धोनीपुढे बीसीसीआयने ठेवली 'ही' अट
हेही वाचा - 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दिवे लावून कपडे बदलू नये', चोप्राने केली पाक चाहत्याची बोलती बंद