दुबई - न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया संघातील टी-२० मालिका नुकतीच पार पडली. यानंतर बुधवारी (१० मार्च) आयसीसीने ताजी टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीत, भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत ३-२ अशा फरकाने पराभव झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची क्रमवारीत घसरण झाली असून ते तिसऱ्या स्थानी घसरले आहेत. याचा फायदा भारतीय संघाला झाला असून भारत तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या भारताचे २६८ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे २६७ गुण आहेत. त्याचबरोबर २७५ गुणांसह इंग्लंड अव्वल क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ सात गुणांनी भारतापुढे आहे. क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहे.
भारताला टी-२० क्रमवारीत पहिले स्थान काबीज करण्याची संधी?
भारत-इंग्लंड यांच्यात १२ मार्चपासून पाच सामन्याच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत मोठा विजय मिळवला तर क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी भारताला असेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध विजय मिळवत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करेल.
फिंचची भरारी, केएल राहुलला फटका
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया टी-२० संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने शानदार कामगिरी केली. त्याने ५ सामन्यात ४९.२५ सरासरीने १९७ धावा केल्या आहेत. याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला असून तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर भारताचा फलंदाज केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या क्रमवारीत विराट कोहली ६ व्या क्रमांकावर कायम आहे.
-
⬆️ Aaron Finch climbs to No.2
— ICC (@ICC) March 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⬆️ Martin Guptill breaks into top 10
Gains for batsmen in the latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings after the #NZvAUS T20 series 👀
Full list: https://t.co/2ImN92Rkvr pic.twitter.com/k578Z47wzM
">⬆️ Aaron Finch climbs to No.2
— ICC (@ICC) March 10, 2021
⬆️ Martin Guptill breaks into top 10
Gains for batsmen in the latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings after the #NZvAUS T20 series 👀
Full list: https://t.co/2ImN92Rkvr pic.twitter.com/k578Z47wzM⬆️ Aaron Finch climbs to No.2
— ICC (@ICC) March 10, 2021
⬆️ Martin Guptill breaks into top 10
Gains for batsmen in the latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings after the #NZvAUS T20 series 👀
Full list: https://t.co/2ImN92Rkvr pic.twitter.com/k578Z47wzM
हेही वाचा - IND Vs ENG : टीम इंडिया पुन्हा रेट्रो जर्सीत दिसणार
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मास्टर चित्रपटातील गाण्यावर डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल