ETV Bharat / sports

तुझको मिरची लगी तो मै क्या करु..! भारताच्या पराभवानंतर पाकच्या खेळाडूंचा तिळपापड - shahab akhtar

विश्वकरंडक स्पर्धेमध्ये अंजिक्य भारताला शेवटी रविवारी पराभवाचे तोंड पाहावे लागले. यानंतर भारतीय संघावर पाकिस्तानच्या क्रिकेटरांसह चाहत्यांचा तिळपापड झाला आहे.

तुझे मिरची लगी तो मै क्या करु; भारताच्या पराभवानंतर पाकच्या खेळाडूंचा तिळपापड
author img

By

Published : Jul 1, 2019, 10:20 PM IST

लंडन - विश्वकरंडक स्पर्धेमध्ये अंजिक्य भारताला शेवटी रविवारी पराभवाचे तोंड पाहावे लागले. यानंतर भारतीय संघावर पाकिस्तानच्या क्रिकेटरांसह चाहत्यांचा तिळपापड झाला आहे. जरी भारतीय संघ इंग्लंडकडून पराभूत झाला तरी, त्याचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. उलट पाकिस्तानचा संघ अडचणीत आला आहे. यामुळेच पाकचे दिग्गज क्रिकेटर भारतीय संघावर चिडले आहेत. मात्र, यावर 'तुझे मिरची लगी तो मै क्या करु' अशी म्हणण्याची वेळ भारतीयांना आली आहे.

इंग्लंड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. तेव्हा पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारतीय संघाविषयी व्यक्त केलेली मतं वाचा....

शोएब अख्तर - इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ चांगला खेळ करू शकला असता. मात्र, भारतीय संघाने केला नाही. पहिल्या १० षटकात आक्रमक खेळ करणाऱ्या भारताच्या हातात ५ गडी होते. तेव्हा मोठ्ठा चमत्कार करण्याची संधी भारतीय संघाकडे होती. असूदे ! इंग्लडने सुंदर खेळ केला. अन् ते त्यात विजयी झाले. आता न्यूझीलंडकडून चांगल्या खेळीची आपेक्षा आहे.

शोएब अख्तर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना सतावले आहे.

वकार युनूस - भारतीय संघाला पाकिस्तानचा 'काटा' काढायचा होता, म्हणूनच भारत इंग्लंडविरुद्ध मुद्दाम पराभूत झाला असा आरोप माजी पाक क्रिकेटपटू वकार युनूसने केला. पाकिस्तानच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळेल की नाही, ते मला माहित नाही. मी त्याबाबत फारसा विचारदेखील करत नाही. पण काही चॅम्पियन संघाच्या खिलाडूवृत्तीची परीक्षा झाली आणि त्यात ते पूर्णपणे नापास झाले.

वकार युनूस पाकिस्तानचा माजी कर्णधार आहे. त्याने एक ट्विट करत भारताचे नाव न घेता टीका केली आहे. मात्र, युसूसने भारत विरुध्द इंग्लडचा हॅशटॅग वापरला आहे.

बासित अली - भारतीय संघाला पाकिस्तान उपांत्य फेरीत नको आहे. यामुळे भारत बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याकडून मुद्दाम पराभूत होतील. भारताचे पाच सामने झालेले आहेत. त्यामुळे त्यांना काही फरक पडणार नाही. मात्र, पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. अफगाणिस्ताविरुद्ध ते कसे खेळले हे सर्वांनी पाहिल आहे. पाकिस्तानने या गोष्टींकडे लक्ष न देता उर्वरित सामने जिंकण्याचा निर्धार करावा.

बासित अली हा पाकिस्तानचा माजी फलंदाज आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये भारताचा संघ पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू नये म्हणून सामने हरनार असल्याचे भाकित केले.

Intro:Body:

patel

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.