नवी दिल्ली - विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ यंदा विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात आहे. ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू झालेल्या क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्यात भारताचा पहिला सामना ५ जूनला साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
विश्वचषकाची सुरुवात ३० मे ला यजमान संघ इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून सुरुवात झाली आहे. तर अंतिम सामना १४ जुलैला लॉडर्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळण्यात येणार आहे.
आयसीसी वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा पाकिस्तानविरुद्ध सामना १६ जूनला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. जाणून घेऊयात आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे होणारे सर्व सामने.