मेलबर्न - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभव विसरून भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावाचे फोटो शेअर केले आहे. यात कर्णधार अजिंक्य रहाणेसह संपूर्ण संघातील खेळाडू सराव करताना पाहायला मिळत आहे. सुखद बाब म्हणजे, दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा देखील सराव करताना दिसून आला.
-
See, who is back in the nets. @imjadeja is here and has started preparing for the Boxing Day Test. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/skKTgBOuyz
— BCCI (@BCCI) December 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">See, who is back in the nets. @imjadeja is here and has started preparing for the Boxing Day Test. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/skKTgBOuyz
— BCCI (@BCCI) December 23, 2020See, who is back in the nets. @imjadeja is here and has started preparing for the Boxing Day Test. #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/skKTgBOuyz
— BCCI (@BCCI) December 23, 2020
डोक्याला मार लागल्याने रविंद्र जडेजा पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. पण तो आता सराव सत्रात गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. त्याने चेतेश्वर पुजारा गोलंदाजी केली. दुसरीकडे शुबमन गिल देखील सराव सत्रात फलंदाजीचा करताना दिसला.
-
Nice and clean from @RealShubmanGill 😎 #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/oHGQsJhDHh
— BCCI (@BCCI) December 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Nice and clean from @RealShubmanGill 😎 #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/oHGQsJhDHh
— BCCI (@BCCI) December 23, 2020Nice and clean from @RealShubmanGill 😎 #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/oHGQsJhDHh
— BCCI (@BCCI) December 23, 2020
बीसीसीआयने फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, आम्ही मेलबर्नमध्ये आहोत आणि लाल चेंडूवर सराव करत आहोत.
टीम इंडिया कसोटी मालिकेत पिछाडीवर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला सामना (दिवस रात्र) अॅडलेडच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पहिल्या सामन्यात फलंदाजांची हाराकिरी -
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला कशीबशी २४४ धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९१ धावा करू शकला. पहिल्या डावात भारतीय संघाने आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात भारतीय धुरंदर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर ढेर झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावात आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे आव्हान २ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला खेळणार
कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतला आहे. अजिंक्य रहाणे त्याच्या अनुपस्थितीत भारताचं नेतृत्व करणार आहे.
हेही वाचा - रोहितने, चहल-धनश्रीला लग्नाच्या शुभेच्छांसह दिला 'हा' सल्ला, ट्विट व्हायरल
हेही वाचा - Aus vs Ind : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी गंभीरने दिला कर्णधार रहाणेला मोलाचा सल्ला; म्हणाला...