ETV Bharat / sports

एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला... - आयपीएल २०२१

जेव्हा मोठा धक्का असतो, तेवढेच दमदार पुनरागनही होतं. मी लवकरच पुनरागमन करेन, असे श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.

India batsman Shreyas Iyer Promises To Be Back Soon From Shoulder Injury
एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला...
author img

By

Published : Mar 25, 2021, 4:59 PM IST

पुणे - इंग्लंडविरुद्ध मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताचा खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. आता त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात येणार आहे. यामुळे तो किमान चार महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. तो आगामी आयपीएल स्पर्धेलादेखील मुकला आहे. यादरम्यान, अय्यरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अय्यरने ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे, की 'जेव्हा मोठा धक्का असतो, तेवढेच दमदार पुनरागनही होतं. मी लवकरच पुनरागमन करेन.'

  • I’ve been reading your messages and have been overwhelmed by all the outpouring of love and support. Thank you from the bottom of my heart to everyone. You know what they say, the greater the setback, the stronger the comeback. I shall be back soon ❤️🙏 pic.twitter.com/RjZTBAnTMX

    — Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

श्रेयसला अशी झाली दुखापत -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही घटना घडली. इंग्लंड डावातील आठव्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने जोरदार फटका लगावला. हा चेंडू रोखण्यासाठी श्रेयसने हवेत झेप घेतली आणि चेंडू पकडला. यादरम्यान त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले.

मी तुमचे मॅसेज वाचत आहे आणि तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंबा पाहून मी उत्साहित आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, असे देखील अय्यरने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीत आता दिल्लीची कमान ऋषभ पंत किंवा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्रेयसने इंग्लंड काउंटी क्लब लंकाशायर यांच्याशी एकदिवसीय स्पर्धेसाठी करार केला होता. या स्पर्धेला २३ जुलैपासून सुरूवात होणार होती. पण तो या स्पर्धेलादेखील मुकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - IPL २०२१ : चेन्नई संघाची जय्यत तयारी, अफगाणिस्तानहून मागवला गोलंदाज

हेही वाचा - चांगला खेळाडू घडवायला दूरदृष्टी असणारा प्रशिक्षक लागतो, दुर्दैवाने प्रशिक्षकांची संख्या घटली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.