कटक - भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका २-१ ने खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात विराट कोहली सामनावीर तर रोहित शर्मा मालिकावीर ठरला. दरम्यान, २०१९ या वर्षात रोहितची कामगिरी शानदार राहिली. तो २०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र, असे असले तरी रोहितला एका गोष्टीचे दुःख आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर रोहित म्हणाला, 'निर्णायक सामना आम्हाला जिंकायचा होता. आम्ही कटकच्या खेळपट्टीवर चांगली फलंदाजी केली. पण या सामन्यात मी आणखी काही वेळ फलंदाजी करायला हवी होती.'
माझ्यासाठी २०१९ हे वर्ष चांगले ठरले. पण जर विश्वकरंडक जिंकला असता, तर खुप चांगले झाले असते, असेही रोहितनं सांगितलं. दरम्यान, रोहितने विश्व करंडक स्पर्धेमध्ये पाच शतकी खेळी केल्या. पण भारतीय संघाला विश्व करंडक जिंकता आला नाही.
अखेरच्या सामन्यात विराटने चांगली कामगिरी केली. त्याला जडेजाने साथ दिली. जडेजाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शार्दुलने मोक्याच्या क्षणी वेगाने धावा जोडल्या. त्याला तोडच नाही. आगामी ऑस्ट्रेलिया संघात होणारी विश्व करंडक स्पर्धा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रोहितने सांगितलं.
हेही वाचा - शमीचे 'फॅन' बनले गावस्कर, म्हणाले, शमीच्या गोलंदाजीमुळे मार्शलची आठवण येते
हेही वाचा - नवीन वर्षातील 'या' दोन मालिकांसाठी भारतीय संघाची आज होणार घोषणा