ETV Bharat / sports

Ind Vs Wi : 'हे' खेळाडू ठरले निर्णायक सामन्याचे नायक - विराट कोहली

निर्णायक सामन्यात विंडीजने दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारतीय संघाने ४८.४ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाच्या विजयात कोणत्या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली वाचा...

ind vs wi 3rd odi :  five indian star who helped india win series
Ind Vs Wi : 'हे' खेळाडू ठरले निर्णायक सामन्याचे नायक
author img

By

Published : Dec 23, 2019, 12:11 PM IST

कटक - भारतीय संघाने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजचा ४ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत २-१ अशी बाजी मारली. विंडीजने दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारतीय संघाने ४८.४ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारतीय संघाच्या विजयात कोणत्या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली वाचा...

रोहित शर्मा -
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने अखेरच्या सामन्यात दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात ६३ चेंडूचा सामना करत ६३ धावा केल्या. यात त्यानं ८ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याने दुसरा केएल राहुलसोबत मिळून भारतीय संघाला चांगली सलामी दिली.

ind vs wi 3rd odi :  five indian star who helped india win series
रोहित शर्मा चौकार लगावताना...

केएल राहुल -
भारताचा दुसरा सलामीवर केएल राहुलने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. राहुलने ८९ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७७ धावा केल्या. राहुलने रोहितसोबत पहिल्या गड्यासाठी १२२ धावांची भागिदारी केली.

केएल राहुल फलंदाजीदरम्यान...

विराट कोहली -
कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात दणकेबाज खेळी केली. त्याने ८१ चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ८५ धावांची खेळी साकारली. विराटच्या याच खेळीने भारतीय संघ विजयाजवळ पोहोचला.

विराट कोहली...

रवींद्र जडेजा -
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या सामन्यात संघासाठी संकटमोचक ठरला. संघ अडचणीत असताना, त्यानं ३१ चेंडूत ३९ धावांची नाबाद खेळी केली. जडेजाने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान दिले. त्यानं १० षटकाच्या गोलंदाजीत ५४ धावा देत एक गडी बाद केला.

रवींद्र जडेजा

शार्दुल ठाकूर -
शार्दुल ठाकूर गोलंदाजीत खास कामगिरी करु शकला नाही. त्याने १० षटकात ६६ धावा देत एक गडी बाद केले. पण त्याने फलंदाजीत कमाल केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर भारत सामना गमावणार असे वाटत असताना, शार्दुल संघासाठी तारणहार ठरला. त्याने ६ चेंडूत दोन चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या.

शार्दुल ठाकूर...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.