गुवाहाटी - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. गुवाहाटीच्या मैदानात नियोजित वेळेनुसार हा सामना ७ वाजता सुरू होणार होता. पण नाणेफेक झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी ९.४६ वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
नियोजित वेळेनुसार, ६:३० ला नाणेफेक झाली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच पावसाला सुरूवात झाली.
पाऊस थांबल्यानंतर ८:१५ ला आणि दुसऱ्यांदा ९:०० वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात आली. तेव्हा पंचांना खेळपट्टीवर ओलसरपणा जाणवला. त्यामुळे त्यांनी अंतिम पाहणी ९:४५ ला घेण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, मैदानावरिल कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी सुकवण्यासाठी प्रयत्न केले.
-
Next inspection at 9.30 PM IST.
— BCCI (@BCCI) January 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
*fingers crossed* pic.twitter.com/pT5wf61yiV
">Next inspection at 9.30 PM IST.
— BCCI (@BCCI) January 5, 2020
*fingers crossed* pic.twitter.com/pT5wf61yiVNext inspection at 9.30 PM IST.
— BCCI (@BCCI) January 5, 2020
*fingers crossed* pic.twitter.com/pT5wf61yiV
शेवटी ९:४५ ला खेळपट्टी पाहून पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या मैदानावर खेळवला जाईल.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार ), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वाशिंग्टन सुंदर.
- श्रीलंकेचा संघ -
- लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणाथिलाका, अविष्का फर्नांडो, कुसल परेरा (यष्टीरक्षक), ओशादा फर्नांडो, भानुका राजपक्षे, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका, इसुरु उदाना, वानिंदु हसरंगा आणि लाहिरु कुमारा.