ETV Bharat / sports

रोहितच्या फलंदाजीवर कागिसो रबाडाची 'सर्जिकल स्ट्राईट' - हिटमॅन

रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा बाद करण्याचा विक्रम न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टच्या नावे आहे. या दोघांनी रोहितला आतापर्यंत तब्बल ८ वेळा माघारी धाडले आहे. रबाडाने आजच्या सामन्यात रोहितला बाद करत या विक्रमाशी बरोबरी साधली. दरम्यान, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने रोहितला ७ वेळा बाद करण्याचा कारनामा केला आहे.

रोहितच्या फलंदाजीवर कागिसो रबाडाची 'सर्जिकल स्ट्राईट'
author img

By

Published : Oct 10, 2019, 6:03 PM IST

पुणे - दक्षिण आफ्रिकेविरुध्द गहुंजे मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात दोनही डावात शतके झळकवल्याने, याही सामन्यात तो दमदार खेळी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने त्याला बाद करत अपेक्षा फोल ठरवली. दरम्यान, रबाडाने रोहितला आजघडीपर्यंत एकूण ८ वेळा माघारी धाडले आहे.

रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा बाद करण्याचा विक्रम न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टच्या नावे आहे. या दोघांनी रोहितला आतापर्यंत तब्बल ८ वेळा माघारी धाडले आहे. रबाडाने आजच्या सामन्यात रोहितला बाद करत या विक्रमाशी बरोबरी साधली. दरम्यान, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने रोहितला ७ वेळा बाद करण्याचा कारनामा केला आहे.

IND VS SA 2019 : kagiso rabada out rohit sharma in international cricket 8th times equal to record of tim southee and trent boult
कागिसो रबाडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या नावे आहे. लंकेचा अँजेलो मॅथ्यूजने रोहितला १० वेळा माघारी धाडले आहे. दरम्यान, आफ्रिकेविरुध्दच्या सुरू असलेल्या सामन्यात रोहित ३५ चेंडूचा सामना करत अवघ्या १४ धावा करु शकला. रबाडाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने रोहितचा झेल घेतला.

हेही वाचा - Ind vs SA Live Update : शतकी खेळीनंतर मयांक बाद, भारत ३ बाद २०५

हेही वाचा - ताशी १४२ कि.मी. वेगाने बाऊन्सर मयांकच्या हेल्मेटवर आदळला...अन्

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.