ETV Bharat / sports

Test Ranking: अव्वलस्थान राखण्यासाठी धावणाऱ्या स्टिव्ह स्मिथला विराटनं मोठी झेप घेत गाठलं - कसोटी फलंदाजी क्रमवारी

विराट कोहलीने आफ्रिकेविरुध्दच्या पुण्यातील कसोटी सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली. याचा फायदा विराटला कसोटी क्रमवारीत झाला. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात विराट दुसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र, त्याने स्टिव्ह स्मिथमधील गुणांचे अंतर कमी केले आहे.

Test Ranking: अव्वलस्थान राखण्यासाठी धावणाऱ्या स्टिव्ह स्मिथला विराटनं मोठी झेप घेत गाठलं
author img

By

Published : Oct 14, 2019, 5:09 PM IST

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. विराट लवकरच कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज करेल, असे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटचे अव्वलस्थान काबीज केले होते. मात्र, आफ्रिकेविरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराट क्रमवारीत सर्वोच्च स्थान गाठणार हे जवळपास पक्के आहे.

विराट कोहलीने आफ्रिकेविरुध्दच्या पुण्यातील कसोटी सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली. याचा फायदा विराटला कसोटी क्रमवारीत झाला. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात विराट दुसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र, त्याने स्टिव्ह स्मिथमधील गुणांचे अंतर कमी केले आहे.

ind vs sa 2019 : icc test rankings virat kohli very close to become no 1 test batsman
विराट कोहली फलंदाजीदरम्यान...

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या नाबाद २५४ धावांच्या खेळीनंतर, विराटने ३७ गुणांची कमाई करत, गुणांची धावसंख्या ९०० पार केली. दरम्यान, सद्य स्थितीत स्टिव्ह स्मिथ या क्रमवारीत अव्वलस्थानी असून त्याची गुणसंख्या ९३७ इतकी आहे. तर विराटची गुणसंख्या आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ९३६ झाली आहे. विराट आणि स्मिथ यांच्यात फक्त एका गुणांचा फरक असून तिसऱ्या कसोटीत विराट स्मिथला मागे टाकत अव्वलस्थान काबीज करेल.

लेटेस्ट कसोटी क्रमवारी गुणांसह -

  • स्टिव्ह स्मिथ (937 अंक)
  • विराट कोहली (936 अंक)
  • केन विल्यमसन (878 अंक)
  • चेतेश्वर पुजारा (817 अंक)
  • हेन्री निकोलस (745 अंक)
  • जो रूट (731 अंक)
  • टॉम लाथम (724 अंक)
  • दिमुथ करुणारत्ने (723 अंक)
  • अंजिक्य रहाणे (721 अंक)
  • क्विंटन डिकॉक (704 अंक)

हेही वाचा - #HBD गौती : गंभीरची विश्वविजेती झुंझार खेळी... श्रीसंतचा झेल अन् धोनीच्या षटकाराने ठरली अंधुक

हेही वाचा - टीम इंडियाला मायदेशात पराभूत करणे, 'मुश्किल ही नही नामुमकिन'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.