मुंबई - न्यूझीलंडचा टी-२० मालिकेत नामोहरन केल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकांमधून बाहेर पडला आहे. यामुळे आगामी कसोटी मालिकेसाठी रोहितची जागा शुभमन गिल घेणार आहे. याची पुष्टी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.
शुभमन गिल भारतीय अ संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याने शुक्रवारी ख्राइस्टचर्चच्या मैदानात न्यूझीलंड अ संघाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या ४ दिवसीय सामन्यात नाबाद २०४ धावांची खेळी केली होती. गिल सद्या तुफान फॉर्मात आहे. त्याने २७९ चेंडूत २२ चौकार आणि ४ षटकारासह ही खेळी साकारली.
दरम्यान, रोहित शर्माला रविवारी झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात दुखापत झाली. त्याचे पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याला अर्ध्यातच मैदान सोडावे लागले होते. कसोटीत रोहितच्या ठिकाणी शुभमन गिल खेळणार हे स्पष्ट झालेले आहे. पण एकदिवसीय मालिकेत हिटमॅनची जागा कोण घेणार? हे पाहावे लागेल.
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - ५ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - ८ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - ११ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - २१ ते २५ फेब्रुवारी, पहाटे ४ वा.
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - २९ फेब्रुवारी ते ४ मार्च, पहाटे ४ वा.
हेही वाचा - ICC T-२० Ranking : राहुलने विराट, रोहितला टाकले मागे, बुमराह 'या' स्थानावर
हेही वाचा - टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण, 'हिटमॅन' न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर