मुंबई - अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा तिसरा आणि चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. तिसरा सामना डे-नाइट पद्धतीने खेळवण्यात येणार असून या या सामन्यात प्रेक्षकांना हजेरी लावण्याची संधी मिळणार आहे. चौथ्या सामन्यातही प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थिती नोंदवून सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. मोटेरावरील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.
नवीन वर्षात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात उभय संघामध्ये ४ कसोटी, पाच टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत होणार आहे. ५ फेब्रुवारीपासून दोन्ही संघात पहिला कसोटी सामना खेळला जाईल. मोटेरा स्टेडियमवरील दोन्ही कसोटी सामने २४ फेब्रुवारी आणि ४ मार्चपासून सुरू होतील.
हेही वाचा - विराटपाठोपाठ कोलकाताचा अष्टपैलू क्रिकेटपटू झाला बाबा
गेल्या आठवड्यात क्रीडा मंत्रालयाच्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) प्रोटोकॉलनंतर स्टेडियमला पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली. जर तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयमधील चर्चा यशस्वी झाली तर, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात स्टेडियममध्ये ५० टक्के चाहते सहभागी होऊ शकतात.