चेन्नई - भारताविरुद्धच्या चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात, दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने द्विशतकी खेळी केली. रूटच्या या विक्रमी द्विशतकी खेळीनंतर बीसीसीआयने त्याचे अभिनंदन केले आहे.
दुसऱ्या दिवशी जो रुटने १४३ व्या षटकात रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे १०० वा कसोटी सामना खेळताना द्विशतक करणारा रुट पहिला फलंदाज बनला आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे द्विशतक ठरले.
जो रुटने द्विशतक पूर्ण केल्यानंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट केले. यात बीसीसीआयने रुटचे अभिनंदन केले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपल्या १०० व्या कसोटीत झळकावलेल्या द्विशतकासाठी अभिनंदन, असे बीसीसीआयने म्हटलं आहे.
-
Congratulations to @ECB_cricket Captain @root66 on his fine double hundred in his 100th Test! @Paytm #INDvENG
— BCCI (@BCCI) February 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details - https://t.co/IEc86nzIZz pic.twitter.com/0uhTR3FnvQ
">Congratulations to @ECB_cricket Captain @root66 on his fine double hundred in his 100th Test! @Paytm #INDvENG
— BCCI (@BCCI) February 6, 2021
Details - https://t.co/IEc86nzIZz pic.twitter.com/0uhTR3FnvQCongratulations to @ECB_cricket Captain @root66 on his fine double hundred in his 100th Test! @Paytm #INDvENG
— BCCI (@BCCI) February 6, 2021
Details - https://t.co/IEc86nzIZz pic.twitter.com/0uhTR3FnvQ
इंग्लंडची सामन्यावर पकड -
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कर्णधार जो रूटचे दणकेबाज द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके, यांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या दोन सत्रात पाहुण्या संघाने निर्विवादीत वर्चस्व राखले. शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी झटपट गडी बाद करत काहीसे यश मिळवले. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली आहे.
हेही वाचा - जो रुटचा विक्रम, १०० व्या कसोटीत द्विशतक ठोकणारा ठरला पहिला खेळाडू
हेही वाचा - Ind vs Eng Test : इंग्लंडने टीम इंडियासमोर उभारला धावांचा डोंगर; जो रुटचे दमदार द्विशतक