मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला दोन मोठे विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. धवनने आतापर्यंत १४० एकदिवसीय सामन्यात खेळताना ४५.४३ च्या सरासरीने ५ हजार ९०६ धावा केल्या आहेत. त्याला ६ हजाराचा टप्पा गाठण्यासाठी ९४ धावांची गरज आहे. त्याने जर हा टप्पा गाठला तर तो अशी कामगिरी करणारा जगातील ६२ वा तर भारताचा दहावा खेळाडू ठरेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारे भारतीय खेळाडू -
- सचिन तेंडुलकर (१८४२६)
- विराट कोहली (१२०९६)
- सौरव गांगुली (११२२१)
- राहुल द्रविड़ (१०७६८)
- महेंद्रसिंह धोनी (१०५९९)
- मोहम्मद अझरुद्दीन (९३७८)
- रोहित शर्मा (९१४८)
- युवराज सिंह (८६०९)
- विरेंद्र सहवाग (७९९५)
याशिवाय, धवनने जर ९४ धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद ६ हजार धावांचा टप्पा गाठणारा जगातील तिसरा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरेल. शिखरने आतापर्यंत १३७ डावात फलंदाजी केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६ हजार धावा करणारे जगातील खेळाडू -
- हाशिम अमला (दक्षिण अफ्रिका) - १२३ डावात
- विराट कोहली (भारत) - १३६ डावात
- केन विल्यम्सन (न्यूझीलंड) - १३९ डावात
- व्हिवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) - १४१ डावात
- सौरव गांगुली (भारत) - १४७ डावात
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 6 हजार धावांचा टप्पा गाठणारे भारतीय खेळाडू -
- विराट कोहली - १३६ डावात
- सौरव गांगुली - १४७ डावात
- रोहित शर्मा - १६२ डावात
- महेंद्रसिंह धोनी - १६६ डावात
- सचिन तेंडुलकर - १७० डावात