ETV Bharat / sports

IND vs ENG : अखेरच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा कस्सून सराव - इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाचा सराव न्यूज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. भारतीय खेळाडूंनी या सामन्यासाठी कस्सून सराव केला.

ind-vs-eng-hosts-sweat-it-out-in nets ahead-of-fourth-test
IND vs ENG : अखेरच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा कस्सून सराव
author img

By

Published : Mar 1, 2021, 9:45 AM IST

अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. भारतीय खेळाडूंनी या सामन्याआधी कस्सून सराव केला. बीसीसीआयने खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या निकालावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा अंतिम फायनलिस्ट ठरणार आहे. उभय संघातील मालिकेत भारतीय संघाने सद्यघडीला २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी चौथा सामना अनिर्णीत किंवा जिंकावा लागेल. इंग्लंडने हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे.

चौथ्या कसोटीआधी भारतीय संघाने सराव सत्रात घाम गाळला. बीसीसीआयने खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो शेअर केले आहेत. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याची तयारी करत आहे, असे कॅप्शन बीसीआयने फोटो शेअर करताना दिलं आहे.

इंग्लंड संघाने चेन्नईत झालेला पहिला सामना २२७ धावांनी जिंकला. यानंतर चेन्नईतच झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांनी विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील डे-नाईट सामना भारतीय संघाने अवघ्या २ दोन दिवसांत जिंकला. भारतीय संघाने अहमदाबाद कसोटीत १० गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियन खेळाडू कोचिंगवर नाराज, लँगर म्हणाले...

हेही वाचा - भारतीय संघच खेळणार WTC चा अंतिम सामना, पाकिस्तानला पूर्ण विश्वास, त्यामुळेच त्यांनी....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.