अहमदाबाद - चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव केला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकत, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकिट मिळवले.
-
That victory against England means India finish the league phase of the inaugural ICC World Test Championship with a fine view from the top of the table 🔝#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/rXFiKPXdB7
— ICC (@ICC) March 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">That victory against England means India finish the league phase of the inaugural ICC World Test Championship with a fine view from the top of the table 🔝#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/rXFiKPXdB7
— ICC (@ICC) March 6, 2021That victory against England means India finish the league phase of the inaugural ICC World Test Championship with a fine view from the top of the table 🔝#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/rXFiKPXdB7
— ICC (@ICC) March 6, 2021
भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ, दुसऱ्या डावात देखील भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकला. आर अश्विन आणि अक्षर पटेल या जोडीने प्रत्येकी पाच विकेट घेत भारताला डावाने विजय मिळवून दिला. पहिल्या डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत सामनावीर ठरला. तर अश्विनला मालिकावीरच्या पुरस्कराने गौरविण्यात आले.
-
A resounding innings victory for India!
— ICC (@ICC) March 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship!#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/CNMmB2KiyQ
">A resounding innings victory for India!
— ICC (@ICC) March 6, 2021
They beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship!#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/CNMmB2KiyQA resounding innings victory for India!
— ICC (@ICC) March 6, 2021
They beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship!#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/CNMmB2KiyQ
चहापानानंतर मैदानात उतरताच अश्विनने त्यांच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्क दिले. त्याने पहिल्यांदा क्रॉलीची विकेट घेतली. त्यानंतर आलेल्या ब्रेअरस्टोवला तर त्याने खातेही उघडू दिले नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेतली. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडला पराभवाच्या खायीत ढकलले. याच फिरकी जोडीने इंग्लंडचे शेपूट देखील स्वस्तात गुंडाळले.
भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर आटोपला. ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी केलेली जबरदस्त खेळी आणि वॉशिंग्टनच्या फलंदाजीमुळे भारताला पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केले होते. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल धावबाद झाला आणि त्याची अर्धशतकाची संधी हुकली.
वॉशिंग्टन सुंदरकडे शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे सुंदरचे पहिलं वाहिलं शतक पुन्हा एकदा हुकलं. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. भारताकडे १६० धावांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या डावात २०५ धावांवर ऑल आऊट केलं होतं.
हेही वाचा - सुंदरला शतकाची हुलकावणी : वाईट वाटतं रे..! लक्ष्मणने व्यक्त केली खंत
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : भारताचा पहिला डाव संपुष्टात, सुंदरचे शतक हुकले