मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये उभय संघात आज पहिला सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघांचा विजयी सुरूवात करण्याचा निर्धार आहे. दरम्यान, दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने, कडवी टक्कर पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शिखर, रोहित आणि राहुल या तिन्ही फलंदाजांना संधी दिली आहे. तर गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर आहे. त्यांना फिरकीपटू कुलदीप यादवची साथ असणार आहे.
भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅश्टन टर्नर, अॅलेक्स करी, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन आणि अॅडम झम्पा.
भारताचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
हेही वाचा - IND VS AUS : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी
हेही वाचा - विराटला घरच्या मैदानावर खुणावतोय सचिनचा मोठा विक्रम