लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंडने सलामीवीर जॉनी बेअरस्टोवच्या शतकी खेळीने न्यूझीलंडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सलामीवीर जॉनी बेअरस्टोव आणि जेसन रॉय यांनी सार्थ ठरवत १८ षटकात १२३ धावांची सलामी दिली. जेसन रॉयने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. रॉय बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या ज्यो रुट आणि बेअरस्टोवने न्यूझीलंडच्या गोलदाजांची पिसे काढली व मजबूत धावसंख्येचा पाया रचला.
दोघांनी संघाची धावसंख्या दोनसेच्या घरात नेली. संघाची धावसंख्या १९४ असताना रुट बाद झाला. त्यानंतर शतकी खेळी केलेल्या बेअरस्टोव ९९ चेंडूत १०६ धावा काढून बाद झाला. बेअरस्टोवने आपल्या खेळीत १५ चौकार आणि १ उत्तुंग षटकार खेचले. एकवेळ बेअरस्टोव असताना इंग्लंडचा चारशे पार करणार असे वाटत होते. मात्र, बेअरस्टोव बाद झाल्यानंतर इंग्लंडची मधळी फळी कोलमडली.
त्यानंतर कर्णधार मॉर्गनने ४० चेंडूत ४२ धावा करत संघाला तीनशे पार केले. न्यूझीलंडने ट्रेड बोल्ट, मॅट हेन्री, जेम्न नीशम यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर सॅनेटर,साऊथी याने प्रत्येकी एक बळी मिळवून इंग्लंडच्या फलंदाजांनी वेसन घातले. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडला हा सामने जिंकणे गरजेचे आहे. तर न्यूझीलंडला उपांत्य फेरीची दावेदारी प्रबळ करण्यासाठी सामना जिंकावा लागणार आहे.