ETV Bharat / sports

ICC T20I Ranking : न्यूझीलंडच्या सेफर्टची भरारी; विराटलाही फायदा - tim seifert news

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिका संपल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

icc t20i rankings tim seifert and tim southee achieve career bests rankings
ICC T20I Ranking : न्यूझीलंडच्या सेफर्टची भरारी; विराटलाही फायदा
author img

By

Published : Dec 23, 2020, 5:13 PM IST

दुबई - न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिका संपल्यानंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. विराट ताज्या क्रमवारीनुसार आठव्या क्रमांकावरुन सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या टीम सेफर्टने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत टीम सिफर्टने धडाकेबाज कामगिरी नोंदवली होती. याचा त्याला फायदा झाला आहे. त्याच्या क्रमवारीत तब्बल २४ स्थानाची सुधारणा झाली आहे. सेफर्टने पाकविरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर टॉप-१० मध्ये प्रवेश मिळवला आहे. सेफर्ट नवव्या स्थानावर विराजमान झाला आहे. भारताच्या लोकेश राहुलने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे.

भारतीय धुरंदर गोलंदाजांना मिळालं नाही स्थान

गोलंदाजांच्या क्रमवारीत राशिद खान ७३६ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर मुजीब उर रहमान याचा नंबर लागतो. इंग्लंडचा आदिल रशिद या क्रमवारीत ७०० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. महत्वाची बाब म्हणजे, भारताचा टी-२० स्पेशालिस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहसह एकही भारतीय गोलंदाज टॉप-१० मध्ये नाही.

हेही वाचा - IND Vs AUS : टीम इंडियाच्या सलामीचा प्रश्न सुटला; गिलला संधी मिळण्याचे संकेत

हेही वाचा - Aus vs Ind : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी गंभीरने दिला कर्णधार रहाणेला मोलाचा सल्ला; म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.