ETV Bharat / sports

आयसीसीकडून लंकेच्या माजी क्रिकेटपटूचे निलंबन

author img

By

Published : Jan 29, 2021, 3:32 PM IST

२००५मध्ये लोकुहेतिगे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, २००८मध्ये तो संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. आयसीसीने चौकशी पूर्ण केल्यानंतर आपला निर्णय दिला आहे. एखाद्या पक्षावर प्रभाव पाडणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि खेळावर थेट प्रभाव पाडणे असे लोकुहेतिगेवर आरोप होते.

Sri Lankan cricketer corruption
Sri Lankan cricketer corruption

कोलंबो - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतिगेला निलंबित केले आहे. लोकुहेतिगे टी-१० लीग दरम्यानच्या भ्रष्टाचाराच्या तीन आरोपांमध्ये दोषी आढळला. आयसीसीने म्हटले आहे की, नोव्हेंबर २०१९मध्ये तीन सदस्यीय न्यायाधिकरणाने आरोप लावल्यानंतर लोकुहेतिगेला तिन्ही प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले.

ICC suspends former Sri Lankan cricketer dilhara lokuhettige for corruption
दिलहारा लोकुहेतिगे

२००५मध्ये लोकुहेतिगे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, २००८मध्ये तो संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला. आयसीसीने चौकशी पूर्ण केल्यानंतर आपला निर्णय दिला आहे. एखाद्या पक्षावर प्रभाव पाडणे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि खेळावर थेट प्रभाव पाडणे असे लोकुहेतिगेवर आरोप होते. याशिवाय त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या पध्दती सांगण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही लावण्यात आला आहे.

हेही वाचा - दुसऱ्या अँजिओप्लास्टीला सामोरा गेला बीसीसीआयचा 'बॉस'

काही दिवसांपूर्वी, आयसीसीने मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी यूएईच्या दोन क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे. मोहम्मद नावेद आणि शमीन अन्वर बट्ट अशी या दोन क्रिकेटपटूंची नावे आहेत. आयसीसीने म्हटले आहे की, दोन्ही क्रिकेटपटू आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कोड अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये टी-२० विश्वचषक पात्रतेदरम्यान दोषी आढळले. यूएईत ही पात्रता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या दोघांवर निलंबनाची कारवाई झाली होती.

या दोन प्रकरणांवरून आयसीसीने भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.