लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत यजमान इंग्लंडचा संघ पूर्ण ताकतीनिशी उतरला आहे. मात्र, इंग्लडच्या तुलनेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेने साहेबाना पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात लंकेने २० धावांनी इंग्लंडला पराभूत केले. सामन्यानंतर इंग्लंडने पुढील सामन्यासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. या सरावात इंग्लड संघाच्या मदतीला अर्जून तेंडूलकर धावून आला आहे.
-
#India Under-19 pacer #ArjunTendulkar, son of cricket legend #SachinTendulkar, was seen helping #England batsman at the nets ahead of their crunch #WorldCup tie against #Australia on June 24.
— IANS Tweets (@ians_india) June 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Photo: IANS pic.twitter.com/iQvhg0wLti
">#India Under-19 pacer #ArjunTendulkar, son of cricket legend #SachinTendulkar, was seen helping #England batsman at the nets ahead of their crunch #WorldCup tie against #Australia on June 24.
— IANS Tweets (@ians_india) June 24, 2019
Photo: IANS pic.twitter.com/iQvhg0wLti#India Under-19 pacer #ArjunTendulkar, son of cricket legend #SachinTendulkar, was seen helping #England batsman at the nets ahead of their crunch #WorldCup tie against #Australia on June 24.
— IANS Tweets (@ians_india) June 24, 2019
Photo: IANS pic.twitter.com/iQvhg0wLti
श्रीलंकेने इंग्लडला पराभव केला. त्यानंतर इंग्लड संघ कस्सुन सराव करत आहे. या कामी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकचा मुलगा अर्जुन साहेबांना मदत करत आहे. इंग्लंडचा मंगळवारी ऑस्ट्रेलियाबरोबर सामना रंगणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट अर्जुन तेंडुलकरची नेट्समध्ये मदत घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडचा संघ कसून सराव करत आहे. हा सामना जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या नेट्समध्ये थेट अर्जुन तेंडुलकरला पाचारण केले. अर्जुन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत असल्याने इंग्लंडच्या संघाने त्याला बोलावले आहे.
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत यजमान इंग्लंडचे ३ सामने उरले आहेत. पण महत्वाचे म्हणजे हे तिन्ही सामने तुल्यबळ संघाशी होणार आहेत. त्याचा सामना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारताशी होणार आहे. सध्या इंग्लंडचे सहा सामन्यांमध्ये आठ गुण आहेत. त्यामुळे जर यापुढील तिन्ही सामने इंग्लंडने गमावले, तर त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागणार आहे.