मेलबर्न - भारतीय गोलंदाज माझ्या स्वप्नात येतात आणि मला सहजपणे आऊट करतात, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार अॅरोन फिंच याने केले आहे. त्याला भारताच्या दोन गोलंदाजांची जाम भीती वाटत आहे.
अॅमेझॉनने ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर एक वेब सीरिज नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्याचे नाव 'टेस्ट सिरीज' असे आहे. या वेब सीरिजमध्ये फिंच, मी स्वप्नातून दचकून उठत असे. भुवनेश्वर मला वारंवार बाद करत असल्याचे स्वप्न पडायची, असे सांगितलं आहे.
फिंच म्हणतो की, 'एक वेळ अशी होती की मला जेव्हा रात्री अचानक जाग यायची. तेव्हा मी बाहेर जाण्याचा विचार करत असे. त्यावेळी मला उद्या सकाळी बुमराहचा सामना करावा लागणार आहे, हा विचार करुन मला भिती वाटायची. तो मला सहजपणे बाद करत होता.'
दरम्यान, फिंचने २०१८ मध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची आठवण काढताना या गोष्टीची कबूली दिली. या मालिकेत फिंच पहिल्यादांच कर्णधारपद भूषवत होता.
भुवी आणि जसप्रीत या जोडीने फिंचला एकदिवसीय, आणि टी-२० मध्ये जेरीस आणले होते. भुवनेश्वरचा इनस्विंग चेंडूवर फिंच अनेक वेळा बाद झाला. भारताच्या या जोडीने फिंचला चार वेळा बाद केले. यात एकदिवसीयमध्ये ३ तर टी-२० मध्ये एकदा बाद केले होते.
फिंचच्या आधी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉनच्या स्वप्नात सचिन येत होता. १९९८ च्या दौऱ्यात सचिनने शेन वॉनचा खास समाचार घेतला होता.
हेही वाचा - सचिनने आजच्या दिवशीच पूर्ण केलं होतं शतकाचे 'महाशतक'; पाहा 'त्या' शतकी खेळीचा व्हिडिओ
हेही वाचा - हिटमॅन रोहितने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सांगितला उपाय; डॉक्टर, नर्सचे मानले आभार