ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ दुखापतीमुळे बेजार झाला आहे. एकापाठोपाठ खेळाडू जखमी होत असल्याने, संघ व्यवस्थापनाला भारतीय संघ निवडताना अडचण निर्माण होत आहे. याच संधीचा फायदा उचलत भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने एक मजेशीर ट्विट केले आहे. यात त्याने, ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी खेळण्याची तयारी दर्शवत बीसीसीआयला तशी ऑफर दिली आहे.
काय म्हणाला सेहवाग –
सेहवागने दुखापतग्रस्त खेळाडूंचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने मजेशीर असे कॅप्शन दिले आहे. त्यात तो म्हणतो, 'इतके खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. जर ११ जणांची भरती होत नसेल तर ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. बीसीसीआयने तेवढं विलगीकरणाचे पाहावे.'
-
Itne sab players injured hain , 11 na ho rahe hon toh Australia jaane ko taiyaar hoon, quarantine dekh lenge @BCCI pic.twitter.com/WPTONwUbvj
— Virender Sehwag (@virendersehwag) January 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Itne sab players injured hain , 11 na ho rahe hon toh Australia jaane ko taiyaar hoon, quarantine dekh lenge @BCCI pic.twitter.com/WPTONwUbvj
— Virender Sehwag (@virendersehwag) January 12, 2021Itne sab players injured hain , 11 na ho rahe hon toh Australia jaane ko taiyaar hoon, quarantine dekh lenge @BCCI pic.twitter.com/WPTONwUbvj
— Virender Sehwag (@virendersehwag) January 12, 2021
सेहवागचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह यांना दुखापत झाली. यामुळे भारतीय संघाच्या समस्येत वाढ झाली. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन देखील दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यानंतर सराव सत्रात मयांक अगरवालला देखील दुखापत झाल्याचे समोर आले. यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा - सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत सिद्धार्थ कौलची दमदार हॅट्ट्रिक
हेही वाचा - वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''अशांना कडक शिक्षा झाली पाहिजे''