लंडन - इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हेदर नाइट आणि मिडिलसेक्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स हॅरिस यांना असोसिएशन ऑफ प्रोफेशनल क्रिकेटरच्या (पीसीए) उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. आता हे दोन्ही खेळाडू पीसीए बोर्डात पदभार स्वीकारतील आणि पीसीए समितीचे अध्यक्ष डेरिल मिशेल यांच्यासोबत काम करतील.
29 वर्षीय नाइट 2016 पासून इंग्लंडची कर्णधार आहे. 2017मध्ये तिच्या नेतृत्वात इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. तर, 30 वर्षीय हॅरिसने वयाच्या 16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 13 वर्षाच्या कारकिर्दीत 261 सामन्यात 620 बळी घेतले आहेत. हॅरिस 2017 मध्ये प्लेयर्स कमिटीमध्ये सामील झाला.
पीसीएची पहिली बैठक पुढच्या महिन्यात जुलैमध्ये होणार आहे. या बैठकीत नाइट आणि हॅरिस सहभागी होणार आहेत.