लाहोर - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. कायद-ए-आजम ट्रॉफीदरम्यान बरगडीचे हाड तुटल्यामुळे हसन अली ही दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकणार नाही.
-
#Pakistan fast bowler #HasanAli was ruled out of 2 home Tests against #SriLanka with a rib fracture. The pacer, who was set to feature in 9th round of Quaid-e-Azam Trophy for Central #Punjab against #Khyber Pakhtunkhwa, pulled out of the contest following pain in left rib. pic.twitter.com/uP1H4S1pRO
— IANS Tweets (@ians_india) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Pakistan fast bowler #HasanAli was ruled out of 2 home Tests against #SriLanka with a rib fracture. The pacer, who was set to feature in 9th round of Quaid-e-Azam Trophy for Central #Punjab against #Khyber Pakhtunkhwa, pulled out of the contest following pain in left rib. pic.twitter.com/uP1H4S1pRO
— IANS Tweets (@ians_india) November 30, 2019#Pakistan fast bowler #HasanAli was ruled out of 2 home Tests against #SriLanka with a rib fracture. The pacer, who was set to feature in 9th round of Quaid-e-Azam Trophy for Central #Punjab against #Khyber Pakhtunkhwa, pulled out of the contest following pain in left rib. pic.twitter.com/uP1H4S1pRO
— IANS Tweets (@ians_india) November 30, 2019
हेही वाचा - इंग्लंडच्या फलंदाजांना घाबरवणारा आयर्लंडचा मुर्ताघ निवृत्त
पीसीबीने एक निवेदन जारी करून हसनच्या बरगडीच्या फ्रॅक्चरला दुजोरा दिला आहे. पाठीच्या समस्येमुळे हसन ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या टी -२० मालिकेत खेळू शकला नव्हता. हसनने पाकिस्तानकडून ५३ एकदिवसीय सामने ३० टी-२० आणि ९ कसोटी सामने खेळले आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये हसनने दुबईमध्ये भारतीय वंशाच्या मुलाशी लग्न केले आहे.
पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर, पाकिस्तान ११ डिसेंबरपासून श्रीलंकेसह होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेणार आहे. दहा वर्षानंतर, पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.