अबुधाबी - मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर'चे समर्थन करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. यात अर्धशतक पूर्ण केल्यावर पांड्याने गुडघ्यावर बसून उजवा हात उंचावत वर्णद्वेषाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला.
-
#BlackLivesMatter pic.twitter.com/yzUS1bWh7F
— hardik pandya (@hardikpandya7) October 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#BlackLivesMatter pic.twitter.com/yzUS1bWh7F
— hardik pandya (@hardikpandya7) October 25, 2020#BlackLivesMatter pic.twitter.com/yzUS1bWh7F
— hardik pandya (@hardikpandya7) October 25, 2020
मुंबई इंडियन्सचा कर्णधार कायरन पोलार्डनेही उजवा हात उचांवत त्याला साथ दिली. पांड्याने सामन्यानंतर 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' असे कॅप्शन देत एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या सामन्यात पांड्याने २१ चेंडूत ६० धावांची स्फोटक खेळी केली. हार्दिकच्या योदानामुळे मुबंईने राजस्थानला मोठे आव्हान दिले. मात्र, बेन स्टोक्सच्या शतकी झंझावातामुळे राजस्थानने मुंबईवर आठ गड्यांनी सहज विजय मिळवला.
मुंबईसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे फलंदाज -
- १७ चेंडूत- हार्दिक पांड्या.
- १७ चेंडूत- इशान किशन.
- १७ चेंडूत- कायरन पोलार्ड.
- १९ चेंडूत- हरभजन सिंग.
- २० चेंडूत- कायरन पोलार्ड.
- २० चेंडूत- कायरन पोलार्ड.
- २०* चेंडूत- हार्दिक पांड्या.