नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हरभजन सिंगने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याविषयी आपली परखड मते दिली आहेत. चॅपेल यांनी प्ले राइट फाउंडेशनशी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी धोनीला मॅच फिनिशर बनवण्याच्या आपल्या भूमिकेविषयी चर्चा केली. त्यानंतर, हरभजनने ''ग्रेग यांच्या हाताखालील भारतीय क्रिकेटचे वाईट दिवस'', असे ट्विट केले होते.
हरभजन म्हणाला, ''चॅपेल यांनी धोनीला मैदानालगत फटके खेळण्याचा सल्ला या कारणासाठी दिला कारण त्यावेळी ते इतरांना मैदानाबाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या काळात चॅपेल यांचे काही निराळेच खेळ सुरू होते.'' या ट्विटला युवराजने उत्तर दिले आहे. युवी म्हणाला, ''धोनी आणि युवी शेवटच्या 10 षटकात मोठे फटके मारायचे नाहीत. मैदानालगतचे फटके खेळा.''
-
🤣 Msd and Yuvi no sixes in the last 10 play down the ground
— yuvraj singh (@YUVSTRONG12) May 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🤣 Msd and Yuvi no sixes in the last 10 play down the ground
— yuvraj singh (@YUVSTRONG12) May 13, 2020🤣 Msd and Yuvi no sixes in the last 10 play down the ground
— yuvraj singh (@YUVSTRONG12) May 13, 2020
2005 ते 2007 या काळात चॅपेल भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त होता. तत्कालीन कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह अनेक खेळाडूंशी त्यांचे मतभेद होते.