मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. यामुळे खेळाडू आपापल्या घरीच कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. बहुतांश खेळाडू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. याकाळात, माजी कसोटीपटू फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. याला त्याने 'पंगा मत लेना', असे कॅप्शन दिले आहे.
हरभजनने २०१० मध्ये झालेल्या अशिया करंडकातील भारत-पाकिस्तान सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला षटकार खेचताना दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पाकविरुद्धच्या या सामन्यात भारताला विजयासाठी ६ चेंडूत ७ धावांची गरज होती. तेव्हा हरभजन आणि प्रवीण कुमार ही जोडी मैदानात होती. समोर होता मोहम्मद आमिर. शेवटच्या २ चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज होती. तेव्हा हरभजनने आमिरला षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला होता.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी कोरोनामुळे पीडित असलेल्यांना आणि गरजू लोकांना मदत करत आहे. आफ्रिदीच्या या प्रयत्नांना भारताचा माजी अष्ठपैलू खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दिला. तेव्हा आफ्रिदीचे कौतुक केल्याबद्दल हरभजनला ट्रोल करण्यात आले. अनेक नेटिझन्सनी हरभजनसह युवीला तुम्हाला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा -पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबियाना करतोय आफ्रिदी मदत
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : IPL रद्द होण्याआधीच 'या' संघाला बसला २५ कोटीचा फटका