ETV Bharat / sports

IPL २०२० : सलामीच्या सामन्यापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी

सीएसकेचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी तो आज होणाऱ्या मुंबईविरूद्धच्या सामन्यासाठी अनुपस्थित असेल. आजपासून आयपीएलच्या तेराव्या पर्वाला सुरुवात होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋतुराजची २४ तासांत पुन्हा कोरोना चाचणी होईल.

Good news for csk as ruturaj gaikwad tests negative for corona
IPL २०२० : सलामीच्या सामन्यापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी
author img

By

Published : Sep 19, 2020, 3:12 PM IST

दुबई - यूएईमध्ये खेळल्या जाणार्‍या आयपीएलच्या सलामीच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सीएसकेचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तो लवकरच संघात दाखल होऊ शकतो.

Good news for csk as ruturaj gaikwad tests negative for corona
ऋतुराज गायकवाड

ऋतुराजची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी तो आज होणाऱ्या मुंबईविरूद्धच्या सामन्यासाठी अनुपस्थित असेल. आजपासून आयपीएलच्या तेराव्या पर्वाला सुरुवात होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋतुराजची २४ तासात पुन्हा कोरोना चाचणी होईल. महत्त्वाचे म्हणजे गायकवाड आयपीएल २०२०चे काही सामने खेळणार नाही. कारण, बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार खेळाडूला खेळण्यापूर्वी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागते. २-३ दिवसांनंतर ही फिटनेस टेस्ट घेतली जाईल.

रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्याने त्याच्या जागी ऋतुराजला संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलमध्ये पदार्पणाच्या अगोदर त्याने टी-२० क्रिकेटमध्ये २८ सामन्यांत ८४३ धावा केल्या आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार असून, पहिल्यांदाच या अत्यंत लोकप्रिय क्रिकेट स्पर्धेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. सलामीचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमध्ये खेळला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.