मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ग्लेन मॅक्सवेलवर १४.२५ करोडची तगडी बोली लावत आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले आहे. मॅक्सवेलने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ठीकठाक सुरूवात केली. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३९ धावा केल्या. या सामन्यात बंगळुरूने मुंबईवर २ गडी राखून विजय मिळवला. यादरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने मॅक्सवेल या हंगामात किती धावा करू शकतो, याबाबतची भविष्यवाणी केली आहे.
इरफान पठाण याने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मॅक्सवेल या हंगामात ४०० धावांच्या आसपास धावा करू शकतो. ग्लेन मॅक्सवेलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वासाने फलंदाजी केली. तो पाहून इरफान म्हणाला की, मॅक्सवेल मुंबईविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या ७ चेंडूवर पूर्णपणे आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळाला. तो या हंगामात जवळपास ४०० धावा करू शकतो.
-
Maxwell will score around 400 runs this season.Looking confident in these first 7 balls he faced. #IPL2021
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maxwell will score around 400 runs this season.Looking confident in these first 7 balls he faced. #IPL2021
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 9, 2021Maxwell will score around 400 runs this season.Looking confident in these first 7 balls he faced. #IPL2021
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 9, 2021
दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा सलामीचा सामना बंगळुरूने अखेरच्या चेंडूवर २ गडी राखून जिंकला. मुंबईने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर निर्धारित २० षटकात ९ बाद १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल विराटच्या बंगळुरू संघाने २० षटकात ८ बाद १६० धावा करत सामना जिंकला. बंगळुरूच्या विजयात एबी डिव्हिलियर्स, मॅक्सवेल, विराटने फलंदाजीत तर हर्षल पटेलने ५ गडी बाद करत गोलंदाजीत योगदान दिले.
हेही वाचा - IPL २०२१ : RCB च्या ७ फूट उंचीच्या गोलंदाजाने कृणाल पांड्याची बॅट तोडली, व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - IPL २०२१ : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सॅम कुरेन गेम चेंजर ठरू शकतो, दिग्गजाचे भाकित