मेलबर्न - इंग्लंडमधून परतल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीने स्वत:ला 'आयसोलेट' करून घेतले आहे. गिलेस्पी हा इंग्लंडमधील ससेक्स काउंटी संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. कोरोना व्हायरसच्या धोका लक्षात घेता २८ मे पर्यंत देशात कोणतेही व्यावसायिक क्रिकेट खेळले जाणार नसल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गेल्या आठवड्यातच जाहीर केले होते.
हेही वाचा - Video : कोरोनामुळे घरीच थांबलेल्या क्रिकेटपटूची, पत्नीने घेतली शाळा
गिलस्पीने सोशल मीडियावर सेल्फ आयसोलेशनची माहिती दिली. गिलेस्पीचा आयसोलेशनचा कालावधी १४ दिवसांचा असणार आहे. 'कोरोना व्हायरसच्या सध्याच्या उद्रेकामुळे ससेक्स आणि मी ठरवलं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये मायदेशी परतणे योग्य ठरेल. आता मी पुढच्या दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये राहणार आहे', असे गिलेस्पीने ट्विटरवर सांगितले.
दरम्यान, चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ३४१ जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे.