नवी दिल्ली - अरुण जेटली स्टेडियममधील एका स्टँडला भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचे नाव देण्यात आले आहे. मंगळवारी या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे याचे उद्घाटन खुद्द गंभीरने केले.
राजधानी दिल्लीत स्थित असलेल्या अरुण जेठली स्टेडियममध्ये फिरकीपटू बिशन सिंह बेदी, मोहिंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावानेही स्टँड उभारण्यात आला आहे. स्टँडला गंभीरचे नाव देण्याचा प्रस्तावाला डीडीसीएने याच वर्षी मंजूरी दिली होती.
-
Arun Jaitley Ji was like a father figure to me and it is a matter of great pride and pleasure to have a stand built in my name at the "Arun Jaitley Stadium". I thank the apex council, my fans, friends, and family who supported me at every step. pic.twitter.com/HcWilZlrho
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Arun Jaitley Ji was like a father figure to me and it is a matter of great pride and pleasure to have a stand built in my name at the "Arun Jaitley Stadium". I thank the apex council, my fans, friends, and family who supported me at every step. pic.twitter.com/HcWilZlrho
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 26, 2019Arun Jaitley Ji was like a father figure to me and it is a matter of great pride and pleasure to have a stand built in my name at the "Arun Jaitley Stadium". I thank the apex council, my fans, friends, and family who supported me at every step. pic.twitter.com/HcWilZlrho
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 26, 2019
यावेळी बोलताना गंभीर म्हणाला, 'मी क्रिकेट जिथे शिकलो. तेथील मैदानावर माझ्या नावाने स्टँड असणे, ही बाब माझ्यासाठी अभिमास्पद असून डीडीसीएने स्टँडला माझे नाव देऊन माझा सन्मान केला आहे. याचा मला आनंद आहे.'
दरम्यान, गौतम गंभीरने क्रिकेटच्या तिनही प्रकारात खेळताना १० हजाराहून अधिक धावा जमवल्या आहेत. यात त्यानं २० शतकंही झळकावली आहे. गंभीरने धोनीच्या नेतृत्वात खेळताना २००७ चा टी-२० विश्व करंडक आणि २०११ सालचा एकदिवसीय विश्वकरंडक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती.
हेही वाचा - शास्त्री गुरूजींनी सांगितलं धोनीच्या 'निवृत्तीचं' रहस्य, म्हणाले....
हेही वाचा - फलंदाजांनो सावधान...बुमराहने मोडलाय स्टम्प!