मँचेस्टर - अॅशेस मालिकेच्या चौथ्या कसोटीत इंग्लंड पराभवाच्या छायेत असून चौथ्या दिवशी त्यांची दुसऱ्या डावात २ बाद १८ अशी अवस्था झाली आहे. भन्नाट फॉर्मात असलेल्या स्टीव स्मिथच्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद १८६ धावांवर घोषित केला आणि यजमानांना ३८३ धावांचे आव्हान दिले.
-
England finish on 18/2 – Australia need eight wickets tomorrow to retain the Ashes.
— ICC (@ICC) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It's been another strong day for the visitors. #Ashes SCORECARD 👇https://t.co/zrb0K55IBc pic.twitter.com/YrJEKFG5Bg
">England finish on 18/2 – Australia need eight wickets tomorrow to retain the Ashes.
— ICC (@ICC) September 7, 2019
It's been another strong day for the visitors. #Ashes SCORECARD 👇https://t.co/zrb0K55IBc pic.twitter.com/YrJEKFG5BgEngland finish on 18/2 – Australia need eight wickets tomorrow to retain the Ashes.
— ICC (@ICC) September 7, 2019
It's been another strong day for the visitors. #Ashes SCORECARD 👇https://t.co/zrb0K55IBc pic.twitter.com/YrJEKFG5Bg
हेही वाचा - पहिल्या जेतेपदावेळी 'तिचा' जन्मही झाला नव्हता, तिनं आज सेरेनाला चारली धूळ!
दुसऱ्या डावात फंलदाजी करताना इंग्लंडने आपले सलामीवीर लवकर गमावले. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पहिल्याच षटकात रॉरी बर्न्स आणि जो रूट यांना माघारी पाठवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो डेन्ली १० धावांवर खेळत आहे.
हेही वाचा - वॉर्नरची 'भोपळा' हॅट्ट्रीक, स्टुअर्ट ब्रॉडने केली सहाव्यांदा शिकार
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्मिथची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने ११ चौकारांसहीत ८२ धावांची खेळी केली. तर, मॅथ्यू वेडने ३४ आणि कर्णधार टीम पेनने २३ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने तीन तर स्टुअर्ट ब्रॉडने दोन बळी घेतले.
धावफलक -
- ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) - ८ बाद ४९७ (डाव घोषित)
- इंग्लंड (पहिला डाव) - सर्व बाद ३०१
- ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) - ४२.५ षटकांत ६ बाद १८६ (डाव घोषित)
- इंग्लंड (दुसरा डाव) - २ बाद १८ (जो डेन्ली खेळत आहे १०; पॅट कमिन्स २/८)