ख्राइस्टचर्च - न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानने सरफराज अहमद आणि हुसेन तलत यांना संघात परत आणले आहे. पाकिस्तान संघाने तलत आणि सरफराजच्या रुपात दोन बदल केले आहेत. याव्यतिरिक्त झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला संघ पाकिस्तानने कायम राखला आहे.
हेही वाचा -बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपला कोरोनाची लागण
शाहिन जफर गौहरच्या जागी हुसेनची संघात निवड झाली आहे. रोहन नजीरच्या जागी सरफराजला संघात स्थान देण्यात आले आहे. नजीर न्यूझीलंड-अ संघाविरुद्ध पाकिस्तान शाहीनचा कर्णधार असेल. फखर झमानने झिम्बाब्वेविरुद्ध तीनही टी-२० सामने खेळले होते. पण प्रकृतीच्या कारणास्तव तो न्यूझीलंड दौर्यावर येऊ शकला नाही.
मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम यांनी शाहीन प्रशिक्षक एजाज अहमद यांना घेऊन या संघाची निवड केली आहे. "टी -२० साठी आम्ही काही दिवस एकत्र असलेला समान संघ निवडला आहे. या संघात युवा आणि प्रतिभावान खेळाडू आहेत ज्यांना आपली नावे सर्वदूर पोहोचवायची आहेत", असे मिसबाहने सांगितले.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप-कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फहीम अशरफ, हैदर अली, हारीस रौफ, हुसेन तलत, इफ्तीखार अहमद, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद मुसा खान , मोहम्मद रिझवान, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान कादिर आणि वहाब रियाज.