लाहोर - पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या निर्णयामुळे तिची १५ वर्षाची कारकीर्दही संपुष्टात आली आहे. सनाने पाकिस्तानकडून १२० एकदिवसीय आणि १०६ टी -२० सामने खेळले आहेत. या सामन्यात तिने अनुक्रमे १६३० आणि ८०२ धावा केल्या आहेत. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५१ आणि टी-२० मध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत.
-
A tribute to one of the icons of women's cricket, @mir_sana05 🙌 #BackOurGirls pic.twitter.com/8LPcJ3dh13
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A tribute to one of the icons of women's cricket, @mir_sana05 🙌 #BackOurGirls pic.twitter.com/8LPcJ3dh13
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 25, 2020A tribute to one of the icons of women's cricket, @mir_sana05 🙌 #BackOurGirls pic.twitter.com/8LPcJ3dh13
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 25, 2020
सनाने पाकिस्तानकडून २००९ ते २०१७ या कालावधीत १३७ सामन्यांचे नेतृत्व केले आहे. “मी पीसीबीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो, त्यांनी मला १५ वर्षे माझ्या देशाची सेवा करण्याची संधी दिली. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि अभिमान आहे. मी सर्व सहाय्यक कर्मचारी, खेळाडू आणि क्षेत्ररक्षकांचा खूप आभारी आहे”, असे सना म्हणाली.
सनाने डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कराची येथे एकदिवसीय आणि मे २००९ मध्ये आयर्लंडविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.