ETV Bharat / sports

''सर्वांचे मनापासून आभार'', कोरोनाग्रस्त आफ्रिदीने केले ट्विट - shahid afridi latest tweet

''जे लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि मला संदेश पाठवत आहेत त्यांचे आभार. आपणा सर्वांचे मनापासून आभार. कृपया या कठीण काळात सुरक्षित राहा आणि गरजू लोकांना मदत करा. आपणा सर्वांना खूप प्रेम'', असे आफ्रिदीने ट्विटद्वारे म्हटले.

former pak cricketer shahid afridi thanks people for blessings
''सर्वांचे मनापासून आभार'', कोरोनाग्रस्त आफ्रिदीने केले ट्विट
author img

By

Published : Jun 14, 2020, 8:37 PM IST

लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने लोकांच्या आशिवार्दासाठी आभार मानले आहेत. कोरोना व्हायरसने जगभरात धूमाकूळ घातला असून या व्हायरसने क्रीडाविश्वातही शिरकाव केला आहे. काल शनिवारी आफ्रिदीने स्वत: ला कोरोनाची लागण झाल्याचे उघड केले. त्यानंतर जगभरातून त्याच्या चाहत्यांनी तो ठीक व्हावा, म्हणून प्रार्थना केली.

''जे लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि मला संदेश पाठवत आहेत त्यांचे आभार. आपणा सर्वांचे मनापासून आभार. कृपया या कठीण काळात सुरक्षित राहा आणि गरजू लोकांना मदत करा. आपणा सर्वांना खूप प्रेम'', असे आफ्रिदीने ट्विटद्वारे म्हटले.

  • I would like to thank all of our supporters throughout @SAFoundationN #DonateKaroNa Ration Drive. Our efforts continue in Balochistan where food supplies & shoes for children were distributed in remote areas across the province
    Ensuring #HopeNotOut
    پاکستان بھر تک, آپ کے گھر تک pic.twitter.com/XQbmNlStig

    — Shahid Afridi (@SAfridiOfficial) June 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आफ्रिदीचा मैदानावरील कट्टर विरोधक असलेल्या गौतम गंभीरनेही आपली प्रतिक्रिया दिली होती. ''या व्हायरसची लागण कोणालाही होऊ नये. आफ्रिदीशी माझे काही बाबतीत मतभेद आहेत, पण लवकरात लवकर तो बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो'', असे गंभीरने म्हटले होते.

40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.