बंगळुरू - कर्नाटकचे माजी फलंदाज जे अरुण कुमार यांची अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण कुमार मागील अनेक वर्षांपासून कर्नाटक संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते.
अमेरिका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयान हिगिंस यांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ही माहिती दिली. ते म्हणतात, 'रणजी करंडक आणि आयपीएल या स्पर्धांचा अनुभव पाहून अरुण कुमार यांची अमेरिका पुरूष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.'
दरम्यान, अरुण कुमार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना ७ हजार २०० हून अधिक धावा केल्या आहेत. तर लिस्ट 'ए' मधून त्यांनी ३ हजार धावा केल्या आहेत. २०१३-१४ आणि २०१४-१५ या सालात त्यांनी रणजी करंडक, विजय हजारे करंडक आणि इराणी कप या स्पर्धांमध्ये कर्नाटकाची धुरा सांभाळली आहे.
अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर ४५ वर्षीय अरुण कुमार यांनी सांगितले की, 'अमेरिकेला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. पण सद्य घडीला विश्वकरंडकाच्या दृष्टीने तयारी करणे, हे लक्ष्य आहे.'
हेही वाचा -''अकमलने स्वत: ला मूर्खांच्या गटात समाविष्ट केले''
हेही वाचा - ''सचिनने अनेकवेळा वॉर्नला आपल्या इशाऱ्यावर नाचवले'', ब्रेट लीची कबुली