ETV Bharat / sports

गावसरांनी पितृत्वाच्या रजेसंदर्भात सोडले मौन, म्हणाले... - सुनील गावसकर लेटेस्ट न्यूज

तत्कालित माध्यमांच्या वृत्तानुसार, गावसकर यांनी रजा मागितली. मात्र, बीसीसीआयने त्यांना रजा देण्यास नकार दिला होता, असे सांगितले गेले होते. गावसकर यांनी तब्बल ४५ वर्षानंतर या घटनेबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी रजा मागितली, यात सत्यता आहे, पण कारण योग्य नाही.''

former indian cricketer sunil gavaskar clears air on his paternity leave matter
गावस्करांनी पितृत्वाच्या रजेसंदर्भात सोडले मौन, म्हणाले...
author img

By

Published : Dec 1, 2020, 12:32 PM IST

Updated : Dec 1, 2020, 1:22 PM IST

नवी दिल्ली - माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी १९७५-७६मध्ये घडलेल्या एका घटनेबाबत खुलासा केला आहे. या काळात भारतीय संघ न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. तेव्हा बीसीसीआयकडे पितृत्वाच्या कारणासाठी रजा मागितली नसल्याचे गावसकरांनी सांगितले आहे.

former indian cricketer sunil gavaskar clears air on his paternity leave matter
सुनील गावसकर

तत्कालित माध्यमांच्या वृत्तानुसार, गावसकर यांनी रजा मागितली. मात्र, बीसीसीआयने त्यांना रजा देण्यास नकार दिला होता, असे सांगितले गेले होते. गावसकर यांनी तब्बल ४५ वर्षानंतर या घटनेबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, "मी रजा मागितली, यात सत्यता आहे, पण कारण योग्य नाही. मी माझ्या पत्नीकडे परत जाण्याची परवानगी मागितली नव्हती. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज दौर्‍यावर असताना मला माहित होते की, माझी पत्नी प्रसूत होणार आहे. असे असूनही, मी भारताकडून खेळण्यासाठी वचनबद्ध राहिलो आणि पत्नीने माझ्या निर्णयाचे समर्थन केले."

हेही वाचा - मॅराडोना यांचा मृत्यू दुर्लक्षपणामुळे?

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात गावसकर दुखापतग्रस्त झाले होते. त्यांना चार आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. ते म्हणाले, "डॉक्टरांनी मला चार आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. पुढील कसोटी सामना तीन आठवड्यांनंतर वेस्ट इंडिजमध्ये होणार होता आणि त्यावेळी मी खेळण्यास पात्र नव्हतो. मी माझे संघव्यवस्थापक पॉली उम्रीगर यांना याबद्दल विचारले. तेव्हा वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी कसोटी संघात सामील व्हावे, या अटीवर मी भारतात परत जाण्याची परवानगी मागितली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही मी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.''

Last Updated : Dec 1, 2020, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.