ETV Bharat / sports

टीम इंडियात खेळलेल्या कोल्हापूरच्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन, BCCI ने वाहिली श्रद्धाजंली - कोल्हापूर क्रिकेटर न्यूज

भारताचे माजी क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूरात निधन झाले.

former indian cricketer sadashiv raoji patil passes away at age of 86
माजी क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे निधन, बीसीसीआयने वाहिली श्रद्धाजंली
author img

By

Published : Sep 16, 2020, 6:44 AM IST

मुंबई - भारताचे माजी क्रिकेटपटू सदाशिव रावजी पाटील यांचे मंगळवारी वृध्दापकाळाने निधन झाले. पाटील यांनी ८६ व्या वर्षी कोल्हापूरच्या त्यांच्या घरात अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या निधनावर क्रिकेट जगतातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयने ही ट्विट करत पाटील यांना श्रद्धाजंली वाहिली. भारतीय संघात खेळलेले पाटील हे एकमेव कोल्हापूरचे क्रिकेट खेळाडू होते.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघाचे माजी पदाधिकारी रमेश पाटील यांनी पीटीआयला सांगितले की, सदाशिव पाटील यांचे कोल्हापूरातील रुईकर कॉलनीमधील घरात निधन झाले. यावर बीसीसीआयने शोक व्यक्त करताना, मध्यम गतीने गोलंदाज करत पाटील यांनी 1952-53 साली महाराष्ट्रासाठी प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण करत आपली छाप सोडली होती, असे म्हटलं आहे.

सदाशिव पाटील यांनी मुंबईकडून खेळताना एका स्पेलमध्ये गोलंदाजी करताना विरोधी संघाला 112 धावात गुंडाळण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याच सामन्यात त्यांनी दुसऱ्या डावात 68 धावात 3 गडी बाद केले. मुंबईने हा सामना 19 धावांनी जिंकला.

पॉली उमरीगर यांच्या नेतृत्वात सदाशिव पाटील यांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी न्यूझीलंड विरोधात पदार्पण केले. यात त्यांनी दोन्ही डावात 1-1 गडी बाद केला. महत्वाची बाब म्हणजे, भारताने हा सामना एक डाव आणि 27 धावांनी जिंकला. यानंतर पाटील यांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी नोंदवली.

पाटील यांनी 1959-1961 या काळात लंकाशर लीगमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना 52 सामन्यात 111 गडी टिपले. 1952-1964 या काळात महाराष्ट्राकडून 36 प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना पाटील यांनी 866 धावांसह 83 गडी बाद केले. पाटील यांनी रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्वही केले आहे.

हेही वाचा - VIDEO : गल्ली क्रिकेटची आठवण करून देणारी 'ड्रीम ११ आयपीएल'ची जाहिरात पाहिली?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.