ETV Bharat / sports

कपिल देव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज - kapil dev angioplasty

फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अतुल माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांना गुरुवारी दुपारी १ वाजता उशिरा दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर आपत्कालीन कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

former indian cricketer kapil dev discharged from hospital after angioplasty
कपिल देव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
author img

By

Published : Oct 25, 2020, 3:50 PM IST

नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. या अँजिओप्लास्टीनंतर आज रविवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी कपिल देव यांचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली.

फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अतुल माथूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांना गुरुवारी दुपारी १ वाजता उशिरा दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर आपत्कालीन कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात आली.

कपिल देव यांची क्रिकेट कारकीर्द -

कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३मध्ये भारताने प्रथमच विश्वकरंडक जिंकला. कपिल देव यांनी भारताकडून १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी अनुक्रमे ५२४८ आणि ३७८३ धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी २७५ प्रथम श्रेणी सामने आणि ३१० लिस्ट-ए सामने खेळले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.