नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने क्रिकेटमध्ये लाळ वापरण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. क्रिकेटविश्वातून अनेक क्रिकेटपटूंनी याप्रकरणी आपले मत दिले. आता कुंबळेची प्रतिक्रिया समोर आली आहे. काही लोकांनी लाळेऐवजी कृत्रिम पदार्थाचा वापरासदंबंधीचे मत दिले होते.
कुंबळे म्हणाला, "आम्ही याबद्दल बोललो आहोत. पण क्रिकेटच्या इतिहासाकडे पाहिले तर कृत्रिम पदार्थांच्या वापराबाबत आपण खूप टीका केली आहे. आपले लक्ष क्रिकेटमधून बाह्य घटक काढून टाकण्यावर आहे. परंतू आता जर आपण हे मंजूर केले तर, क्रिकेटवर त्याचा खूप मोठा प्रभाव राहणार आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे."
कुंबळे पुढे म्हणाला, "आयसीसीने यावर निर्णय घेतला होता. परंतु दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कठोर निर्णय घेतला. जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण राखले जात नाही तोपर्यंत हा तात्पुरता उपाय आहे. नाही. परिस्थिती सुधारेल असे मला वाटते."
चेंडूला चमकवण्यासाठी गोलंदाज लाळ आणि घामाचा वापर करतात. मात्र, कोरोनामुळे क्रिकेटमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.