नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डिन जोन्स यांनी यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ही स्पर्धा होणार नसल्याचे जोन्स म्हणाले. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. परंतु कोरोनाव्हायरसमुळे या स्पर्धेबाबत अनिश्चिततेचे सावट आहे.
जोन्स म्हणाले, "ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा अनेक कारणांमुळे होऊ शकणार नाही. सर्व प्रथम, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लोकांना रोखले आहे. जेव्हा आपल्याकडे 16 संघ आणि प्रत्येक संघात खेळाडू, कर्मचारी आणि प्रशासकांसह 30-40 लोक असतील, तेव्हा आपण ही स्पर्धा करण्यास सक्षम असणार नाही."
ते पुढे म्हणाले, "विशेषत: ऑस्ट्रेलियामध्ये निर्बंध कडक आहेत आणि यजमान देशदेखील विश्वकरंडक स्पर्धेतून भरपूर पैसे कमवू शकणार नाही. यजमान देश पैसे कमवतात. पण या नियमांमुळे हे शक्य होऊ शकणार नाही."
"अर्थातच ऑस्ट्रेलियादेखील इतर सर्व क्रिकेट बोर्डाप्रमाणेच आहे आणि म्हणून ते स्वत:चा बचाव करण्यात व्यस्त आहेत. मला वाटते की ते भारताला सांभाळू शकतात. पण अन्य 15 देशांना सांभाळू शकत नाहीत.''