नवी दिल्ली - इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी विराटबद्दल केलेली भविष्यवाणी सांगितली आहे. हुसेन म्हणाला, “ भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सांगितले होते, की विराटकडे खूप कौशल्य आहे आणि तो आगामी काळात स्टार होईल”.
एका क्रिकेट कार्यक्रमात हुसेनने या गोष्टीचा उलगडा केला. “मी त्याच्याबद्दल (कोहली) डंकन फ्लेचर यांच्याशी बोलत होतो. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही फक्त पाहा, तो एक योद्धा खेळाडू आहे. विराट आकडेवारीला घाबरत नाही. त्याला फक्त संघाचा विजय आणि पराभवाचा विचार असतो ”, असे हुसेनने सांगितले.
कोहली सध्या क्रिकेटच्या सर्व प्रकारात सरासरी ५० पेक्षा जास्त धावा करत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णाम्माचारी श्रीकांत यांनी विराटची तुलना कपिल देव यांच्याशी केली आहे.