ETV Bharat / sports

एबी डिव्हीलियर्स वादळ टी-२० विश्व करंडकात घोंगावणार, कर्णधार डू प्लेसीसने दिले संकेत

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीसने सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी डिव्हीलियर्सला संघात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. फाफ डू प्लेसीसच्या पूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी डिव्हीलियर्सचे संघात स्वागत करायला आवडेल असे सांगत त्यांनी डिव्हीलियर्ससोबत मागील ३ ते ४ महिन्यांपासून बोलणी सुरू असल्याचे सांगितले आहे.

Faf Du Plessis said Talks On For "2-3 Months" To Get AB De Villiers Back In Team
एबी डिव्हीलियर्स वादळ टी-२० विश्व करंडकात घोंगावणार, कर्णधार डू प्लेसीसने दिले संकेत
author img

By

Published : Dec 17, 2019, 7:57 PM IST

नवी दिल्ली - क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हीलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहायला मिळू शकतो. याचे संकेत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीसने दिले आहेत. डिव्हीलियर्सने २०१७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती.

याबाबत फाफ डू प्लेसीसने सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी डिव्हीलियर्सला संघात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. फाफ डू प्लेसीसच्या पूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी डिव्हीलियर्सचे संघात स्वागत करायला आवडेल असे सांगत त्यांनी डिव्हीलियर्ससोबत मागील ३ ते ४ महिन्यांपासून बोलणी सुरू असल्याचे सांगितले आहे.

निवृत्ती जाहीर केल्यानंतर डिव्हीलियर्स सध्या वेगवेगळ्या लीग स्पर्धामध्ये खेळत आहे. त्याने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, फाफ डू प्लेसीस आणि मार्क बाऊचर यांच्या वक्तव्यावरुन डिव्हीलियर्स पुन्हा मैदानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहायला मिळू शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर १२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका होणार आहे.

हेही वाचा - भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू भारतीय संघाला धोकादायक ठरणार ?

हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद : पाकिस्तानने गुणांचे खाते उघडले, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.